पाेरीच्या रं बापा...
पाेरीच्या रं बापा...
पाेरीच्या रं बापा, मन ठेव माेठं आता,
शिक्षणदान देवून सक्षम बनव तू दाता...
पाेरीच्या रं बापा, युग तिचंच अवतरलं,
घाबरू नकाे घडीघडी तिनंच युगानुयुगे तारलं...
पाेरीच्या रं बापा,संस्कारक्षम बनव तिला,
आजच्या युगात तुझ्या काेण विचारतं संपत्तीला...
पाेरीच्या रं बापा, राग मानू नकाे रं,
ऐकताे खूप वाईट म्हणून म्हटलं आता बरं...
