* पाचोळा *
* पाचोळा *
वसंत ऋतूची पहात वाट,ओसाड पठारावर मी निष्पर्ण....
वाट पाहुनिया थकली गात्रे ,संधीप्रकाशी मन होई विदीर्ण !
वाऱ्याच्या उन्मादाने होई पानगळीचा जीर्ण पाचोळा,
काळोखाच्या गर्द छायेत
गहिवरल्या मनाच्या व्यथा वेळोवेळा !
पाचोळ्यागत उद्विग्न मन तुझे,अजूनही रुसले मन बावरे...
मनाच्या डोही तरंग उमटवतील मावळतीचे रंग गहिरे !
जीवन आहे क्षणभंगुर
नको बसू उदास एकटा..
एक झुळूक आशेची, फुटतील त्यास असंख्य वाटा !