ओटी खणा नारळाची...
ओटी खणा नारळाची...
ओटी खणा नारळाची
भरते माझ्या आईची.
दिली तिनं संधी मला
पुन्हा आई होण्याची.
पोटातल्या बाळासाठी वणी गड
मी सातव्या महिन्यात चढला.
आले साकडं घालूनी
माझ्या मी आईला.
थोर तुझे उपकार आई, सुखरूप
लेक माझा जन्मास तू घातला.
येईल लवकर मी त्याला
घेऊन आई तुझ्या दर्शनाला.
व्यथा तू जाणुनी एका आईची
माझ्या हाकेला तू अंबे धावली.
सुखाने झोळी भरून ग तू
माझ्या नवसाला पावली.
ओटी खणा नारळाची
भरते माझ्या आईची.
सुखी ठेव तुझ्या लेकरांना
मागते जोगवा आता हाची.
