ऑनलाइन प्रणाम....
ऑनलाइन प्रणाम....


या गुरुजनांनो ऐका तुम्ही,
कोरोनाच्या लॉकडाऊनचे गाणे...
बाहेर पडणे जेव्हा झाले,
होते खूपच जीवघेणे...!
बाहेर पडलात तुम्ही तेव्हा,
डॉक्टर अन् पोलिसांच्या संगे..
शाश्वती नव्हती तुम्हालाही
तुटतील कधी आयुष्याचे धागे..!
सापडता संशयित कोणत्याही गल्लीत,
गेलात तेथे तेथे करण्यास नोंदी..
करुन क्वारंटाइन त्यांना शाळेत,
उतरवलीत आरोग्याचीही धुंदी...!
वायफायही बसवून घरच्या घरी,
शिकवलेत मुलांना ऑनलाइन धडे..
शाळा बंद पण शिक्षण चालू,
एकाच या ध्येयाने ठरलात वेडे..!
शिक्षक तुम्ही नव्या युगाचे,
घडवता उत्तम नागरिक सारे....
पसरवता सर्वत्रही देशामध्ये,
ज्ञानाचे नवविचारांचे वारे...!
नमन तुम्हाला करतो ,
दोन्ही कर हे जोडून..
स्वीकार करावा प्रणाम माझा,
तुम्ही ऑनलाइन येवून....!