ऑनलाईन प्रेमाचे..
ऑनलाईन प्रेमाचे..
ऑनलाईन प्रेमाचे
ऑफलाईन धडधडणे असते..
मॅसेंजरच्या पावसात
शब्दांचे गडगडणे असते..!!
पोस्टवरच्या बगिच्यात
स्मायलींचे फुलणे असते..
बोटांच्या टप्प्यावर
मुक्याचे बोलणे असते..!!
वॉलवरच्या फोटोसाठी
डोळ्यांचे झुरणे असते..
आंबट शौकिनांना ते
लोणच्याचे मुरणे असते..!!
ऑनलाईन प्रेमाचे
रोजच हुरहुरणे असते..
साठीच्या वयातही
मन कसे तरणे असते..!!
