ओझे दफ्तराचे
ओझे दफ्तराचे
ओझे दफ्तराचे वाटत नव्हते
पाठीला ते सांभाळत होते
पायात साध्या चपला असायच्या
तुटल्यावर त्यात पिना घुसवायच्या
एकच दफ्तर फाटेपर्यंत वापरायचं
ईकडून तिकडून पुस्तक पडायचं
हट्ट तरी करायचा कसा
जेमतेम खर्च भागायचा तसा
जुनी पुस्तके नवीन कव्हर
फाटलेल्या पानावर जाई नजर
डिंकाने चिकटवून झाकायचे हळूच
बघताना येत न्हवते कळूच
अशा बऱ्याच अवस्था असायच्या
झाकत झाकत प्रगतिपुस्तकात चमकायच्या
