STORYMIRROR

Shraddha Salvi

Inspirational Children

4  

Shraddha Salvi

Inspirational Children

चाचा नेहरू

चाचा नेहरू

1 min
197

भारत नाही गुलाम कुणाचा

फडकत राही तिरंगा आमुचा

असे गरजणारे नेहरू चाचा

मुलांचे लाडके नेहरू चाचा


स्वतंत्र भारताचे पंतप्रधान ते पाहिले

पूर्ण आयुष्य त्यांनी भारतास वाहिले

गुलाब लावून कोटास दिला प्रेममंत्र

इंग्रजांशी लढण्याचे दिले भारतास तंत्र


दिला साऱ्या जगाला संदेश शांतीचा

विश्वात उंचावला मान भारतमातेचा

आदर्श म्हणावे असे होते आमुचे चाचा

भारतमातेचे सुपुत्र नेहरू चाचा


जात नाही धर्म नाही 

नव्हता कसला द्वेष

एकच होती इच्छा छोटी

पुढे जावा भारत देश


बालदिनाच्या या दिवशी

भेदभाव विसरून जाऊ

लहानथोर , राव नि रंक

एकमेकांत मिसळून जाऊ


नवभारताचे पाईक आम्ही

जय भारत हा नारा आमुचा

बालदिनाला स्मरण करूया

आपुले नेहरू चाचा


Rate this content
Log in

More marathi poem from Shraddha Salvi

Similar marathi poem from Inspirational