STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Children

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Children

हातांची बोटे

हातांची बोटे

1 min
452

मानवाला मिळाले दान

दोन हातांची बोटे दहा

हातांमध्ये जादू आहे

फक्त एकदा करूनी पहा...!!


हातांमध्ये धरूनी कुंचला

चित्र काढता येते छान

सात रंगाचा मिलाप करता

बनते इंद्रधनुची मस्त कमान....!!


दोन रेषेत गिरवा अक्षरे

सुंदर बनते हस्ताक्षर

लिहून वाचून आपण

बनुयात सारे साक्षर......!!


पाच बोटे मिळवता बघा

हाताची बनते घट्ट मूठ

शक्तीचे ते द्योतक आहे

नाही बोलणार कोणी झुठ...!!


दहा बोटांचे काम चांगले

कामात येते जलद गती

धष्टपुष्ट रहा निरोगी

नाही कुणाची भिती.....!!


सर्व कामे करतील सरसर

करा दानधर्मासाठी हात पुढे

दोन हाती धरूनी पुस्तक वाचता

यशाची शिडी उंच चढे.....!!


वारली, पेंटींग, रांगोळी, मेहंदी

कधी हात वाजवती तबला

नित्य कराटीचे धडे घेता

ना राहणार कोणी अबला....!!


बोटेच वाजवती सात सुरांची पेटी

सुमधुर, संगीत,धून वाजे बासरी

वाजवततात कधी ढोल,ताशा

पाण्यामध्ये खडे मारीत मुले हासरी...!!


आई करते भाजी छान छान

दोस्तांनो बोटांची जादू पहा

बोटांची करामत बघण्या

सुंदर चित्र काढून तर पहा....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children