उन्हाळी सुट्टी
उन्हाळी सुट्टी
1 min
202
परिक्षेनंतर सुट्टीची
वाट पहात होतो,
उन्हाळी सुट्टीत आम्ही
खूप मजा करत होतो.
मामाच्या गावाला जायचो
विना मास्क लावून,
सर्वजण खेळत होतो
मनाने मोकळे होऊन.
त्या केशरी आईसक्रीमची
चव आठवते मला अजून,
कैरीच्या फोडी खायचो
बरोबर वाटून.
रात्री बाजेवर झोपायची
वेगळीच मजा होती,
सकाळी कोकीळाची गाणी
ऐकून झोप उघडत होती.
या महामारीने जगच
गेले पालटून,
कुणास ठाउक कधी येणार
ते चांगले दिवस उलटून.
