STORYMIRROR

Gaurav Daware

Others Children

4  

Gaurav Daware

Others Children

शाळेचा कैवारी....

शाळेचा कैवारी....

1 min
166

शाळा प्रत्येकाची असतें भारी

थोडी विचित्र अन थोडी मजेदारी

शिकतात पोर जणू राजाच्या दरबारी

खेळतात अशी जणू आहे सावकारी


थोडी अल्लड आणि थोडी हुशारी

घेऊन येतात आपल्या शाळेत सारी

करून थोडया मस्त्या अन शिरजोरी

शिकतात इथे सगळे बनून कैवारी


सुट्टीतला डबा म्हणजे पिकनिक भारी

नाश्त्याची चव जणू जिभेवर वारी 

खाऊन भांडून भांडतात सारी

खरच अश्या शाळेची गोष्टच न्यारी


काही इथे करतात अल्लड मारामारी

तर काहींची दोस्ती असतें दुनियादारी

बनवून नवी नाती बनतात कलाकारी

खरच शाळेची दुनिया असतें अविष्कारी


इथे काही असतात प्रेमाचे पुजारी

तर काहित चालते नुसती मारामारी

थोडे शिरजोर अन थोडे कैवारी

खरच अश्या शाळेची काही गोष्टच न्यारी.


Rate this content
Log in