STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

एप्रिल फुल

एप्रिल फुल

1 min
201

आई बाबा दादा ताई यांना

सर्वानाच लागली होती चाहूल

आज घरातला छोटा बंटी

करणार आहे सर्वाना एप्रिल फुल


सकाळपासून लागला कामाला

शोधू लागला एक छान संधी

खूप विचार अनेक कल्पना

एक ही कामाला पडले नाही


आईला चकवून पाहिलं तसं

बाबाला ही त्याने चकवलं

ताई दादांनी दादच नाही दिलं

बंटी मग नाराज होऊन बसलं


जीवनात नेहमी जागृत राहावं

कुणाच्या बोलण्यात फसू नये

खोटे खोटे बोलून आपण ही

दुसऱ्या कुणाला फसवू नये


खरी शिकवण मिळाली बंटीला

एप्रिल फुलच्या दिवशी खास

सर्वाना धन्यवाद देत म्हणाला

बनवणार नाही कोणाला मूर्ख

आजपासून ठेवा माझ्यावर विश्वास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children