STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories

रिमझिम पाऊस

रिमझिम पाऊस

1 min
247

रिमझिम रिमझिम पडतो पाऊस

आई म्हणते पावसात नको जाऊस


मला तर भिजायची खूपच हौस

घरात राहावं वाटेना बनून माऊस


शाळा नाही मित्र नाही काय मी करू

चला पावसात कागदाची होडी सोडू


घरातच बसून आलंय फार कंटाळा

पावसासोबत जरा खेळू दे ना मला


तुम्ही सारेच असता कामात व्यस्त

तुमचा सरतो सगळाच वेळ मस्त


थोडंसं वाचावं नि थोडंसं लिहावं

की वाटतं थोडा वेळ खेळ खेळावं


आईचा त्याला सुद्धा असते नकारघंटा

खिडकीतूनच करतो पावसाला टाटा


नुसतं बघल्याने सांगा मजा येईल का ?

खेळले नाही मुलांनी तर वेळ जाईल का ?


Rate this content
Log in