मुले आणि फुले
मुले आणि फुले
1 min
378
सडा फुलांचा पडे
माझ्या अंगणात सदा
मंद सुवास पसरे
परिसरात सर्वदा
नाचत येती मुले
सुवास घेत सगळी
विनवणी करती मला
फुले वेचण्याचा पळापळी
सुंदर रंगीबेरंगी फुले
आनंद पसरवे चोहीकडे
पाहुनी मुलांचे चेहरे
मन तृप्त होई सवंगडे
किलबिल माझ्या घरात
बाहेर फुलांचा सडा
आनंदाने घरात खेळून
घाले फुलां भोवती गराडा
घराभोवती या माझ्या
फुलांमुळे सुगंध दरवळे
खेळता बागडताना
मुलांमुळे हास्य खळखळे
