कवितेचे शीर्षक-ऐसा ॠतु वसंत हा
कवितेचे शीर्षक-ऐसा ॠतु वसंत हा
तो मातीचा सुगंध दरवळे ऐसा ॠतु वसंत हा|
अन् इंद्रधनुंनी बहरून येई अवघा आसमंत हा॥
चहोबाजूंनी निळेशार दाटून येई अंबर|
अंगणात त्या मयुर नाचता पावसाची हुरहूर ॥
नव्या पिकांनी बहरून आली पावन झाली धरती|
शेतकरी राजाचे माझ्या दुःखाचे दिन सरती॥
अलगद त्या सरींनी माझ्या देहाला स्पर्शावे|
गारव्यात बेहोश होऊनी माझ्यावर बरसावे॥
लेऊनी ही बेधुंद नशा वाहे हा वादळवारा|
रम्य वाटतो दाहीदिशेला माहोल हा सारा॥
तो मातीचा सुगंध दरवळे ऐसा ॠतु वसंत हा|
अन् इंद्रधनुंनी बहरून येई अवघा आसमंत हा॥