मायेची सावली
मायेची सावली
1 min
212
आईला कुणी म्हणे माय
तर कुणी म्हणे माऊली
माया ममता प्रेमाची मूर्ती
आई तर मायेची सावली
झाडं फुल देते फळ देते
उन्हात देते सर्वाना सावली
आई देखील एक झाडंच
सर्वाना घेते ती पदराखाली
पोटाला चिमटा देऊन वाढविते
आपले दुःख कळू देत नाही
लेकरांना सुखी ठेवण्यासाठी
रात्रंदिवस कष्ट करत राही
आई थोर तुझे उपकार
आईला काय देऊ उपहार
खुप ऋण आहेत माझ्यावर
या जन्मी फेडू ना शकणार
