ओढ
ओढ
उलटून गेली सांजवेळ
अन् झाली घालमेल लेकुरवाळ्या माऊलीची
नाही तमा काट्या कुट्यांची,
नाही भिती श्वापदांची,
मनी दाटली चिंता चिमण्या पाखरांची,
लागली ओढ घरट्याची
तुडवित रान निघाली माय,
ना कसले तिजला भय
अधिर झाली माऊली,
वेध लागले आता भेटीचे,
चिमुकल्यांना कुरवाळण्याचे
वाट पाहुनि भिजले डोळे
केविलवाण्या लेकरांचे
मिणमिणता कंदील सोबतीला,
एकटा तोचि आधार जिर्ण झोपडीतला
दिसली सावली मायेची दुरून,
अन् आनंदिली पिल्ले गहिवरून
न्हाऊनि गेली चंद्रमौळी झोपडी,
प्रेमाच्या अथांग सागरात,
लाभले स्वर्गीय सुख आईच्या मिठीत

