STORYMIRROR

Nishigandha Kakade

Drama Tragedy Others

3  

Nishigandha Kakade

Drama Tragedy Others

ओढ त्या सरणाची....

ओढ त्या सरणाची....

1 min
421

संसाराची वेल बहरते,

त्यावरी एक फुल उमलते,

सटवाई मग भविष्य करते,

श्र्वासाची मग गती बदलते,

जगण्याची मग ओढ लागते,

हसणे-रडणे तेव्हा उमगते,

कडू-गोड ते मूल बोलते,

माणुसकी ते शिकुनी घेते,

कितीदा मग पदरात ते लपते,

कुतूहलाने ते बागडते,

अ आ इ ई वदू लागते,

हळू हळू मग वयात येते,

हट्ट करोनी सर्व मागते,

नशिबी सारे भरभरून लाभते,

मोठे होता पंख पसरते,

राणी मागे निघुनी जाते,

माय एकली झुरत रहाते,

बापालाही घर सूने भासते,

नयन दोघांचे वाट पाहते,

मिठीत घ्याया मन बावरते ,

गहिवरली ती माय पिलाची,

करोनी पहानी गतकाळाची ,

असेल इच्छा हीच देवाची,

शंका वाटे दिलेल्या प्रेमाची,

शिक्षा झाली कोणत्या चुकीची??

का मी सवय लावू तुझ्या नसण्याची?

या हून प्रिय मज ओढ त्या सरणाची?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama