नयन तुझे
नयन तुझे


नयन तुझे स्वप्न माझे
धावत माझ्याकडे येशील का
पाहण्या झालो उतावीळ
डोळे भरून पाहू देशील का
तुझ्या आठवणींची पोतडी
ओजंळीत माझ्या सांडशील का
लटक्या रागाने माझ्याशी
पुन्हा पुन्हा भांडशील का
तुझ्या मोहक नजरेने
घायाळ मजला करशील का
पुरता बुडालो प्रेमात तुझ्या
नाजूक हातांनी सावरशील का
वाट पाहतो तुझ्या येण्याची
तिन्हीसांजेला भेटशील का
झालो अधिर ऐकण्यास सखे
चार शब्द तू बोलशील का