STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

नव्या वाटा

नव्या वाटा

1 min
510



कितीदा नव्याने

भेट माझीच मला

नव्या वाटेवर

नव्या वळणांवर


उभी शोधत ?

माझ्यातल्या मला

पुन्हा नव्याच त्या

भासाव्या जुन्याच वाटा


चालत राहिले

येईल त्या वाटेने

काही ना काही

हाती येत राहिले


सहज लक्ष वेधले

पुढच्या नव्याच वाटेने

खूप प्रवास करायचा आहे

लगेच लक्षात आले


सगळंच नाही ना

पार करू शकत अंतर

ध्येय सापडलं

वाटलं थांबावं क्षणभर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational