नववर्ष स्वागत
नववर्ष स्वागत
आले सरत हे वर्ष
संमिश्रशा भावनांत
मनी कल्पनाकल्लोळ
काय असेल पुढ्यांत?
जरी मनी कातरता
झाले लसीकरणही
नावे नोंदवूनी जन
महाराष्ट्र अग्रभागी
गेला करोनाचा शत्रू
जरा लोक सैलावले
सणवार हो साजरे
बार लग्नांचे उडाले
तोच हा ओमायक्राँन
वर डोके काढू पाही
नक्की हटवू तयासी
घेऊ सर्वत्र काळजी
मास्क नवे वापरुनी
राखू माफक अंतर
स्वच्छतेच्या सवयींनी
करु मात रोगावर
मानवता धर्म मानू
साह्य करु एकमेकां
पुन्हा सज्ज रणांगणी
डोस घेऊ बूस्टरचा
ठेवू आदर्श पुढती
थोर जन सेवकांचा
करु मात शर्थीने
उजळवू सहाय्यता
करु नवीन वर्षात
परमेशा विनवणी
कृपा करावी भक्तांसी
तार तूची सकलांसी
