नवरी
नवरी
एक मुलगी जी असते नवरी..
ती तिच्या शहरात अलग असते दोहरी
उमळता कळी रूप व्हावे फुलाचे,
तसे बाबाच्या छकुलीचे रूप व्हावे नावरीचे ,
जी मुलगी मी तिच्या लहानपणात खेळतानी पाहली,,
आज मी तिला तिच्या लग्नात,
बोहल्या वर चढताना पाहली....||ध्रु ||.
एक मुलगी जी असते नवरी..
माहेरची ती अल्लळ आणि मस्ती खोर,
सासरची होणार नवरी समजदार पोर,
दारी सजतो मांडव पण उरात भरते धडकी,
आता सोडून जाणार बाबाची छकुली लाडकी
सूर सनईचे पडता कानी डोळ्यात येता पाणी
आठवत राहतात छकुलीची बोबळी गाणी..||१||
एक मुलगी जी असते नवरी..
हो - नाही म्हणता म्हणता,
लग्न जुळले एकदाचे,
देवा कडे नेहमी मागणे शेवटचे,
वर मिळू दे माझ्या बाबा सारखे एकदाचे,
ज्या मुलीला कधी स्वतःची खोली
सुध्दा नाही सांभाळता आली
आज तिने तिच्या सासरची जबाबदारी पेलली||२||
एक मुलगी जी असते नवरी....
मंगलअष्टकाचा गुंज सुरू झाला , बाबा कडे
बघताच अश्रु चा वर्षाव सुरू झाला,
लेकीचा सांभाळ करा म्हणून,
बाप हात जोडीत होता,,
डोळ्या मध्ये पाणी आणून ,
छकुली कडे एकटक पाहत राहतो,,
भातुकलीच्या खेळात संसाराचा खेळ मांडता मांडता
आज बाबाच्या पिकुली ने खरा संसार सांभाळला||३||
