नवरात्र ( रचना 4)
नवरात्र ( रचना 4)
श्यामरंगी रंगून आज
पसरली सर्वत्र निळाई
निळे आकाश सागरात
ती लेवून आली ठाई-ठाई
निळे आकाश वाटे
जणू तिने पांघरले
अथांग सागराचे तिच्यात
प्रतिबिंब जाहले
असंख्य वादळे मनात
तरी शांत शितल
चेहऱ्यावर भाव
आत्मविश्वासाने भरपूर अशी
ती नारी शक्ती असे तिचे नाव
