STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

नवं भारत...

नवं भारत...

1 min
565

नवं भारत घडवू चला रे

नवं भारत घडवू...।।धृ।।

दुर्गुणांची करून होळी

सद्गुणांची कास धरू

इतिहासाचा आठव करुनी

शौर्याचा त्या माज करू....नवं

क्रांती वीरांची स्वप्ने सारी

स्वसामर्थे सार्थ करू

एकजुटीने सारे आपण

प्रगतीचे कार्य करू...नवं

तिरंगा देशाचा उंच करू

हृदयी त्याचा सन्मान धरू

विश्वव्यापी डंका पिटुनी

लोकशाहीची ख्याती सांगू...नवं

सत्यमेवजयते ब्रीद आमचे

जगा समोरी मांडू

मी महान माझा देश महान

देशभक्तीचा जागर करू....

                 नवं भारत घडवू चलारे

                 नवं भारत घडवू.........!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational