नवीन सुरुवात
नवीन सुरुवात
स्वतःमधल्या वाईट प्रवृत्तीचा नाश म्हणजेच
रावणाचे दहन आहे..
महा शूर पराक्रमी आणि बलाढ्य
असा तो रावण आहे..
प्रत्येक वर्षी वाईट गोष्टीचे दहन केले पाहिजे
हाच त्याचा उद्देश आहे..
जेव्हा रावण बनवतो तेव्हा तो बलाढ्य असा
समोर उभा राहतो आहे..
तेव्हा त्याचा नाही स्वतःचा विचार करायचा
हीच तर नवीन सुरूवातीची वेळ आहे..
जरी त्याला दहा तोंड असली तरी माणूस
आणि धड एकच आहे..
तसच वेगवेगळे तोंड म्हणजेच वेगवेगळे
आचार विचार सोडायचा आहे..
तसेच शेवटी सगळं काही मंगलमय होऊ दे
अशी प्रत्येकाची इच्छा आहे..
माणसे सोन्यासारखी असतात फक्त विचारांची
हेळसांड होत आहे..
हे कळताच सगळं काही प्रत्येकाच्या
मनासारखे होते आहे..
