नवी सुरवात
नवी सुरवात
जबाबदारी वाढली तशी, वेळेची झाली कपात
आयुष्या मध्ये पुन्हा एकदा, झाली नवी सुरवात
हा थोडया सुखाचा, भरावा लागेल जकात
रडण्याच्या योगाने, पाणी येईल थोडे नाकात
मागे वळून पाहिले, हसू येते हळूच गालात
आयुष्या मध्ये पुन्हा एकदा, झाली नवी सुरवात
संकटे कितीही आली, तरी सुखाचे गीत गात
असंख्य अनुभवाची सोबत, त्यात मी न्हात
कैक प्रकारची परिस्थिती, याची डोळ्या पाहात
आयुष्या मध्ये पुन्हा एकदा, झाली नवी सुरवात
काय घेऊन येईल आज, येणारी नवी पहाट
बरसतील धारा की, दाटतील धुके दाट
होऊ दे काहीही आता, मीही पाहतोय वाट
आयुष्या मध्ये पुन्हा एकदा, झाली नवी सुरवात
लोकांच काय पाहायचं, लोकं काहीही करतात
कोणाचं पाप इथे, सांगून कोना भरतात
साऱ्या सारखं इथे, सारे इथेच मरतात
आयुष्या मध्ये पुन्हा एकदा, झाली नवी सुरवात