STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

नवे वर्ष नवा संकल्प...

नवे वर्ष नवा संकल्प...

1 min
230

भारताला महासत्ता बनविण्याचा

संकल्प नव्या वर्षाचा करुया,

घोटाळे, भ्रष्टाचार करून बंद

मार्ग विकासाचाच धरुया.


देशासाठी जगण्या,मरण्याचे

संकल्प नववर्षाचे करु ,

एकतेने नांदू सारे सुखाने

बंधूभावाचे बीज पेरु .


सदविचार,सदवर्तन, सन्मार्गाने

जगू आपण अवघं आयुष्य,

मानवता,नीतिमत्ता जोपासू

तरच उज्ज्वल होईल भविष्य.


आतंकवाद, नक्षलवाद, दहशतवाद

नको मुळीच ती हिंसा ,

धर्म एकच तो मानवता

माणूस म्हणून जग माणसा.


नववर्षाचे नवीन संकल्प

राष्ट्रोध्दाराचे आपण करू,

गाठू यशाचे ऊंच शिखर

नवी वैज्ञानिक क्रांतीच करू.


नाव जगी या करू देशाचे

जगी महान हा भारत खूप,

गरीबी, बेकारी नको भेदभाव

नववर्षाचा हा करूया संकल्प !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational