नवदुर्गा म्हणजे स्त्री शक्ती
नवदुर्गा म्हणजे स्त्री शक्ती
नवदुर्गा म्हणजे स्त्री शक्ती
तूच दुर्गा तूच रणरागिणी,
जयंती जय हे हंसवाहिनी,
आपल्या संसारी तू महाराणी........
तुझ्यात गार्गी, मैत्रेयी, कल्पना
वंशाच्या दिव्याची तू दिव्यमणी
तुझ्यातच संवेदनशील जननी
तूच आई, भार्या भू साम्राज्ञीनी......
आम्ही अस्त्र आम्हीच शस्त्र
लढण्यासाठी तत्पर मनोमनी
अंगअंगात सामर्थ्य जागवू
होवून काली महिषासूरमर्दिनी.....
थकले ब्रम्ह चैतन्य जेथे
अवतरल्या जगी आई अन् बहीनी
खेळ जगाचा या स्त्रीशक्तीवर
अवतरली धरनीवरती जगजननी.........
तूच दुर्गा तूच चंडीका काली
तूच पृथ्वीची कन्यका स्वाभिमानी
जिवंत दैत्य,दानवांना नष्ट कराया
घे त्रिशूल,तलवार हाती नारायनी......
आनावयास तेजोमय झळाळी
तुझ्याच उदरी जन्म घेवूनी
उत्तुुंग भरारी या स्त्रीशक्तीची
निर्मियली जिवंत सौदामिनी ......