नवा सूर...
नवा सूर...
निवळली गर्दी, निवळला आक्रोश...
घरी पसरली ती फक्त भयाण शांतता...
जेव्हा तेवणारा दीप कायमचा विझला....
अन् काळोखातही देऊन गेला किरण आशेचा ...
यातना या कशासांगू कोणाला...
पण तिरंग्यात लपेटलेला देह देई नवी उमेद मनाला...
न खचता जगायचंय आत्ता तुझ्याविणा...
आपल्या संसाराचा गाडा ओढायचाय फक्त मला...
तुझ्या कर्तव्यांनी दिली जगण्याची नवी दिशा...
धेय्य मनी बाळगलय आत्ता फक्त स्वप्नपूर्तीच तुझ्या...
तिरंग्याची शान वाढवण्यात मी ही घेईल खारीचा वाटा...
कारण गर्व आहे मला फौजीची अर्धांगिनी असल्याचा...
