नूतन वर्ष
नूतन वर्ष
नूतन वर्ष
करू आता संकल्प
घेऊ प्रकल्प
नवी उमेद
रुजते ही मनात
आसमंतात
लाभो सर्वांस
उत्तम आरोग्याचे
क्षण सुखाचे
दुःखाची भाषा
विसरुनी ही सारी
करा तयारी
दिशाही मिळो
सर्जनशीलतेला
स्वप्नपूर्तीला
अंगी बाणू दे
नावीन्य कर्तृत्वाचे
समाधानाचे
