STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

नमन माझे शिवप्रभूला

नमन माझे शिवप्रभूला

1 min
297

सगळीकडे झाले बादशहा

क्रूर यवनी पातशहा

 पण हिंदूंचा झाला एकच

प्रजाहित दक्ष शहेनशहा


 सगळीकडे कल्मा पढून

 डोक्यावर ठेवले रक्तरंजित मंदिल

 पण एकच आमचा राजा

 झाला जिंकून प्रजेचे दिल


राज्याभिषेक ऋचा मंत्राने

 झाला अभिषिक्त सम्राट 

लोकांच्याही मनावरती

अधिराज्य केले दिनरात


सप्तनद्यांचे जल आणूनी

 अभिमंत्रित केले उच्च रवानी

 सिंहासन केले बत्तीस मणी

राजा हिंदूचा झाला या भुवनी


 पाहण्या हिंदुपदपादशाहा

अधीर झाली सर्वांची मने

 तृप्त जाहली जनता सारी 

 तृप्त जाहले कान लोचने


6 जून 1674 साला

राजा हिंदूंचा झाला

 राजा जनतेचा झाला

 नमन माझे त्या शिवप्रभूला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational