STORYMIRROR

Padmakar Bhave

Abstract Tragedy

4  

Padmakar Bhave

Abstract Tragedy

नक्षी

नक्षी

1 min
299

पुन्हा यावेत उडून

ते दिन बालपणीचे,

मनमौजी हिंदोळ्याचे

मोरपंखी आठवणींचे


तसे खळाळते हसू

आता नाही ओठावर,

पुन्हा येईल का सांगा?

पुन्हा फूल देठावर


किती अनवाणी पायी

रोज तुडवल्या वाटा

नाही कधीही टाचेत

गेला वेदनेचा काटा


नाही आलीच कधीही

थाळी गोड पक्वान्नांची

तरी कधीही तक्रार

नाही आलीच जिभेची


काठोकाठ आनंदाने

तळे होते भरलेले

जरी काठावर होते

दुःख लौकिक थोरले


गेला वेगात उडून-

काळ होऊनिया पक्षी

डोळेभरुनी पहावी

त्याची पाठमोरी नक्षी!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract