STORYMIRROR

Anita Bodke

Tragedy

4  

Anita Bodke

Tragedy

नकोस इतका...

नकोस इतका...

1 min
448

नकोस इतका छळू पावसा

नको तिथे कोसळू पावसा


घर माझे पाझरते आहे

अश्रू लागले गळू पावसा


सवय बरी ना झोडपण्याची

बरस जरासा हळू पावसा


नको ढगाच्या जात्यामधुनी

दुःख तुझे तू दळू पावसा


खेळात तुझ्या थकून गेले

सांग किती मी पळू पावसा?


नको असा तू भलत्यावेळी

डोळ्यांतून ओघळू पावसा


रागामध्ये नको ढगाचे

दार असे आदळू पावसा


लागली आहे मलाच माझी

चूक आता रे कळू पावसा


बस झाला धिंगाणा येथे

गरज तिथे चल वळू पावसा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy