STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

3.6  

Prashant Kadam

Romance

नको धरू अबोला !

नको धरू अबोला !

1 min
29.4K


बोलना हे सखे तू , नको धरू अबोला

ह्रदय माझे जाळीतो, सोड हा अबोला


तुझ्या समेत बोलतां, मज येतो उमाळा

वाटते नच सरावा, हा प्रेमातला उमाळा


अगा प्रेम माझे, सांग येईल ना फळाला

लागू नये वाटते, नजर कुणाची फळाला


असो कधी कुठे ही, कोणता ही सोहळा

रात्रंदिन स्वप्नी सजे, मिलनाचा सोहळा


प्रयत्न ही संपले अन् , धीर ही गळाला

लागेल सांग केंव्हा, मत्स्य ह्या गळाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance