STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

2  

Prakash Chavhan

Abstract

नका वाट अडवू कुणाची

नका वाट अडवू कुणाची

1 min
43

नका वाट अडवू कुणाची 

वाटसरु नाही थांबायचा त्या वाटेचा 

जसा ध्यास असतो एका वाटेला 

दुसऱ्या वाटेस भेटायचा 


नका वाट अडवू कुणाची 

जायला इथं सर्वच आले 

नवं बीज ते काय? थांबायला येणार 

इथलं मात्र इथंच राहणार 


नका वाट अडवू कुणाची 

तिचा जन्मच सर्वांसाठी 

तुमचं आमचं काय जिरणार 

जिरणार पानी उपयोगाचं 


नका वाट अडवू कुणाची 

का? लढता एकमेकांसोबत 

आपलं पण एक सागर असेल 

तो बसून वाट पहात असेल 


नका वाट अडवू कुणाची 

कधी कुणाची कुठून सुरु होईल 

संपण्यास काय? मग ती कुठं थांबणार 

भलं भल्याच होतं वाईटाच नीच रं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract