STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

नका करू हो तुम्ही कन्यादान...

नका करू हो तुम्ही कन्यादान...

1 min
402

एक विचारू का? बाबा तुम्हाला
आता मला उंबरठा ओलांडायचा
पण परक करू नका मला
नका करू हो तुम्ही कन्यादान ...

बाबा , खरं सांगते तुम्हाला
नव विश्व आणि नव्या माझ्या स्वप्तरेषा
पण आई आणि बाबा हवे सोबतीला
नका करू हो तुम्ही कन्यादान...

आई, थारा नसेल कधीच थोड्या थोड्या गोष्टीला
दोन विचारधारा अन् दोघांचीही असेल बात
सांभाळून घेईल मी दोघांच्याही मनाला
नका करू हो तुम्ही कन्यादान...

माझे मार्ग बंद करून नका म्हणु ये माहेराला
हे माझे घर राहू द्या माझ्या हक्काला
मी सजवेल नव्या घरट्याला
नका करू हो तुम्ही कन्यादान ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract