STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

निषेध...

निषेध...

1 min
163

देवा तु कर ना निषेध ...

देव देव करीत येता ,

गाभ्याऱ्यात लोटांगण जाता,

तुझ्याच निर्माण केलेल्या ,

माणसांचा यांना किळस येता,

तेव्हा ,देवा तु कर ना निषेध ...

समानतेचा मंत्र तुझा ,

सुक्ष्म थोर तुच प्रसूता ,

भेदाभेद नाही तुजला,

तुझ्या दरबारी सदैव एकता,

विविधतेची सांगड घालता,

सुंदर सोज्वळ तुच निर्मिता ,

भेदाभेद करेल जेथे ,

चपराक लाव हो तु बोलता,

तेव्हा ,देवा तु कर ना निषेध ...

अत्याचार नको ना आता,

कुठलाही छळ नको ,

नको अराजकता ,

मानव जात तुझीच माणकं ,

धाग्यांत ओवण्या ,

लाव तुझी संहिता ,

तोडेल जो नियम येथला,

तेव्हा , देवा तु कर ना निषेध ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract