निसर्ग
निसर्ग
तू ,मी ,अन पाऊस सारखे भिजत असतो, कळकळून आलेलं आभाळ,
कोरडी, ढिसाळ झालेली जमीन,
रूक्ष झालेले पानं, कोमेजलेले फुल,
काहीही सुचत नसल्यासारखी
उगाचच इकडून तिकडे वाहवणारी धूळ, पक्ष्यांचे कोरडे आवाज, सुकलेली विहीर,
आटत चाललेली नदी,
निस्तेज डोलणारी गवताची पाती,
अजूनच मातकट होऊ
घातलेला काळाकभिन्न पाषाण,
मुकं मुकं होत जाणारं पिवळधमक ऊन ,कपाटातून हळूच डोकावणारी छत्री,
अन पावसाच्या एकातरी थेंबाची
वाट पाहणारे आपण, सगळे
कसे एकच विचाराने का होईना
पण जात ,धर्म, रंग, रुप ,उजवा, ङावे
सगळं विसरुन एकत्रित आनंद घेतो
( मनात कुठलाच हेवेदावे,मत्सर न ठेवता)
हीच तर निसर्गाची किमया,
नाही तर आपल्या सारख्या
सामान्य माणसाला कुठे जमतय असे ?
नाही का...