निसर्ग...!
निसर्ग...!
मला काय वाटतं
हे बरोबर तो हेरतो
हळूवार मग
मुलायम स्पर्शाने
अलगद
लीलया साकारतो
असा साथी
हातातून हवं ते
सारं सारं
प्रत्यक्ष दाखवतो
तेव्हा त्याचं अप्रुप वाटतं
तो आज पुन्हा
हातात आला
म्हणाला चल
तुला सैर घडवतो
आणि एक एक
पदर उलगडत गेले
आणि
मन माझे आकाशी
स्वैर फिरू लागले
अगदी उंच उंच
सारे पक्षी गण
कौतुकाने उडता उडता
थोडे अचंबित झाले
माझी गरुड झेप आज
गरुडालाही लाजवत होती
कारण झेपच उतुंग नभी
मुक्त होउनी
विहारात होती
निसर्गाला कवेत घेण्याची उर्मी
आज उफाळून आली
तशी पहाटे पहाटे
मज जाण झाली
म्हंटले
आता पुन्हा पालवी फुटणार
वसंत फुलणार
भाग्योदय होणार
जन्म सार्थकी लागणार
जीवन कृथार्थ होणार
आशा पुन्हा पल्लवित झाली
तोवर तांबडे फुटले
आणि मला जाग आली
पाहतो तर काय
शेजारी कुंचला वाट पहात होता
कागद ही डोळे फाडून पहात होता
मला राहवले नाही
निसर्गाला
म्हटले आता
अवतर माझ्या कागदावर
आणि
पुन्हा दाखव एक
नवी पहाट
किलबिलणारी
मंद मंद गार गार वारा
अंगा अंगाला चाटणारी
हवीहवीशी वाटणारी....!
