निसर्ग (अष्टाक्षरी)
निसर्ग (अष्टाक्षरी)
1 min
12K
निसर्गाच्या सान्निध्यात
राहतात चराचर
तोच अनादि अनंत
स्वार्थी आपण पामर...
लूट किती करायची
केली नाहीच गिनती
येता अस्मानी संकट
वात विझली पणती...
नैसर्गिक आपत्तीची
झळ बसते मानवा
अश्रूंच्याच धारा वाहे
मनी पेटता वणवा...
देता निसर्गा आव्हान
मानवात नाही शक्ती
कामी येईल सदाच
तेथे निसर्गाची भक्ती...
चला संकल्प करूया
करू निसर्ग रक्षण
वेळ आता आली आहे
करा आत्मपरीक्षण...