STORYMIRROR

Vinay Dandale

Abstract Others

3  

Vinay Dandale

Abstract Others

निरोप

निरोप

1 min
226

निरोप घेताना ते म्हणाले... 

आपण खरंच जात आहात, 

आम्ही आमच्या इथे एक शिस्त लावलीय 

मग इथून गेल्यावर आपलं काय होईल? 

आपण तर पूर्णतः गोंधळून जाल 

आपला फक्त नि फक्त गोंधळ होईल...

 

मला हसायला आलं, 

पण स्वतः ला सावरून उत्तरलो,

हो बरोबर आहे... होईल, 

खूप गोंधळ होईल... 

पण , 

तो माझा वैयक्तिक गोंधळ असेल 

आणि 

आपल्या इथल्या भंपक शिस्तीपेक्षा 

माझा गोंधळ चांगलाच असेल...   


कमीत कमी 

माझ्यातला माणूस, या गोंधळात 

त्याच्या आतला आवाज शोधेल... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract