STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

निरोप बाप्पाला

निरोप बाप्पाला

1 min
229

दहावा दिवस

निरोप बाप्पाला

गहिवरे मन

अश्रू लोचनाला   (१)


देव गजानन

भक्तांसाठी येती

संकटे नाशूनी

घराकडे जाती   (२)


भक्त आनंदती

सोहळा करती

पूजन करुनी

मोदक अर्पती   (३)


क्षण निरोपाचा

हेलावे सर्वांना

देवाला सांगती

लवकर या ना!!  (४)


पुनरागमन

देवाने करावे

संकटी तारावे

भक्तांसी रक्षावे   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract