निरागस भाव
निरागस भाव
निरागसतेने भरले असे लहानपण
त्याच्यात असे सारे देवपण
शुद्ध भाव डोळ्यात मनात
छुनचून आवाज असे पैंजणात
तुरुतुरु चालत पळत सुटायचं
निरागस भावनेने सारच न्याहाळायचं
बोबड्या बोलींच दुडदुड्या चालींच
इथून तिथून कौतुकच व्हायचं
मनातल्या आत्म्याचे शुद्ध रूप
बघताच क्षणी यायचा हुरूप
