निळ्या ढगांची गोष्ट
निळ्या ढगांची गोष्ट
निळ्या ढगांवर.....
तो उन्हाचा कवडसा थोडा दूर होऊन,
मावळतीच्या रंगांनी,
त्या नभीच्या सूर्याला जायची परवानगी द्यावी,
आणि ते रंग नजरेने मनांत उतरवण्याआधीचं,
कूठलीही चाहूल न देता काळोख घेऊन अचानक या ढगांनी गर्दी करावी,
आणि पावसाची आशा घेऊन
या मनाने त्या वार्याच्या लकेरीसोबत क्षणोक्षणं झुरावे,
आणि पावसाने भेटं न घेता चं परत फिरावे.
मगं निळसर शालू घेऊन विसावलेल्या ढगांवर
आपली एक छटा दिसण्यासाठी
त्या मावळतीच्या तांबूस पिवळ्या रंगांनी एक रेखोटी ओढावी,
आणि त्या क्षणी ही रंगमय साजं पाहून,
असंख्य शब्दांनी मनांत फेर धरावे,
पावसाआधी या, 'निळ्या ढगांवर', मगं,
कवीने काव्याचे रंग उधळावे
