नीरज चोप्रा
नीरज चोप्रा
खेळातून तू रचलास इतिहास,
गवसणी घातलीस उंच गगनास,
झळाळी दिलीस तू सुवर्णास,
मनामनात जागवलास आत्मविश्वास,
भारतमातेचा तू सुपुत्र गंगा,
अटकेपार गाजवलास तिरंगा,
प्रत्येक भारतीयांच्या
गर्वाचा आहेस तू साज,
लक्ष्मीमातेस प्रिय पंकज,
तद्वत प्रिय आहेस नीरज,
कार्यकर्तृत्वाचा साज चढविलास,
ठसा उमटविलास जनमनात,
आत्मविश्वास वाढविलास मनामनात,
वाटे धन्यता तुझा वारसा जपण्यात!!!
