नदीकिनारी
नदीकिनारी
नदी किनारी
मंद धुंद गारवा
तो अनुभवा १
प्रतिबिंब हा
सूर्याचा पडलेला
पाणावलेला २
सळसळल्या
पानवेली किनारी
धुंदीत सारी ३
अशी मी शांत
उभी खडकावर
त्या मातीवर ४
नदी वाहते
वाहून नेते सारे
सांगे किनारे ५
