STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action Inspirational

3  

Sarika Jinturkar

Action Inspirational

नदी

नदी

1 min
435

उगम आहे तिचा उंच डोंगरावर  

उंचावरून येते मिळेल ते घेऊन आणि असेल ते देऊन सदैव आपली वाहत राहते 

निळ्याशार या पृथ्वीवर  


कधी खळखळ हसते 

कधी अचानक कोसळते 

कधी शांत वाहते तर कधी उद्रेकही करते  

कधी पाण्याचा झुळझुळ आवाज करते तर

कधी हळूच गाली हसते


 नदीकाठच्या मंदिराला स्पर्शून जाते

 जणू भगवंताला ही ती वंदन करून येते 

डोंगर-दऱ्या पार करून मिळते सागराला अथक प्रयत्नानंतर यश 

येते तिच्या संघर्षाला  


ना कधी दुर्गंधाची तक्रार , ना गढूळ "पाण्याची भ्रांत "

 नदी वाहत राहते शांत आणि संथ

कार्य करित राहते प्रचंड  


भरभरून देते सर्व प्राणिमात्रांना  

ना कधी देण्याचा अधिकार गाजवते 

वाट अडविली कोणी तिची जरी 

आपली दुसरी वाट शोधून ती पुढे जाते  


उन्हाळ्यात सुकून सुद्धा पावसाळ्याची 

आतुरतेने विश्वासाने वाट बघते 

भरभरून वाहतांना आपलं गांभीर्य किंवा मर्यादा न गमावता वाट 

 असली तरी कसं वाहायच तिला ठाऊक असते  


कधी वाहते ही होऊन नागमोडी वाट 

 बघावा,असतो काही वेगळाच थाट  


तिच्याकडून एक नक्कीच शिकाव काही न ठेवता स्वताकडे सतत वाहत राहावं 


 कार्य आहे नदीचे खरंच महान 

भागवते साऱ्या जीवांची तहान  

"देणे "तिचा गुणधर्म व 

माहिती आहे जगाला

 प्रेमाचा झरा तिचा पाहून 

आनंद होतो मनाला  


आज वाटलं, आपल्या मनाने ही नदीसारखं वाहावं 

 वाटेवरच्या वळणावर थोड्या वेळ थांबाव  

नात्यातील ऋणानुबंधाना प्रेमाने जोडावं  

आप्तजनांसाठी सदैव कार्यरत रहावं  

चिंता विवंचना ना अलगद पाण्यात सोडवं 

संतापाच्या परिणामांना शांत प्रेमाने भरावं  

झालं गेलं ते तिथल्या तिथल्या 

विसरून जावं

 नदीतील पाण्यासारखं स्वच्छ,

 निर्मळ, राहून 

 आनंदाने, मनसोक्त आयुष्य जगावं ..🙏☺️😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action