नात्यांच्या गर्दीत...
नात्यांच्या गर्दीत...
नात्यांच्या ह्या गर्दीत... आता जगणं सोपं नाही,
स्वत:ला बदलून पाहिलं..सिद्ध करणं सोपं नाही....
बोलणे लागे जिव्हारी घाव आपल्यांचेच,
घावावर मलम कोणी लावण्यास येत नाही...
सगळीकडे फक्त गरज वापर आपला होत आहे,
आपलं परकं ह्याच्याचच मनात कापरं भरत आहे.....
स्वत:हुन घेतली जबाबदारी पेलणे कठिण आहे,
बालपणीच्या सुखद गोष्टींची आठवण मनी येत आहे...
शब्दाचेच करूनी वार जो तो श्रेष्ठ ठरत आहे,
मी माञ घेललेल्या वचनातच जगत आहे....
शुन्यातून उभे रहाणे येथे आता कुणा जमतं नाही,
आयत्या बिळावर नागोबा अशीच सगळ्यांची रित आहे...
दिखाव्याचे जग सारे छान छान साऱ्यांना आवडते,
निःस्वार्थी, आपलेपणाची जाणीव होणे आता ह्या युगात कठीण आहे....
