नातं
नातं
असं असावं नातं हो
कसं असावं नातं,
दोन मनांत सदाच
विश्वासाचं खातं..
निरपेक्ष भावनांचा संगम
नित्य मनी चैतन्य वसलेलं,
त्या नात्यातून परिमळ सुंदर
अंतरातून सहज हसलेलं..
अहंकार,गर्व तो फुकाचा
नको गैरसमजाचा वारा,
व्यवहाराच्या साच्यापासून
दूरस्थ एक किनारा....
नातं तुझं-माझं असावं
एकरूपतेचं ओजस्वी,
नित्य ममता, प्रीत त्यांत
ओतप्रोत भरावी...
ओढ अशी बेभान करूनी
क्षण विना नसे सुखाचा,
मनी फुलावा मार्ग सदैव
प्रगती नि सदिच्छांचा...
