नातं
नातं
कोणतं नातं सांगा खरं नाही उरली नाती, भरोसा मुळीच उरला नाही सारेच विश्वासघाती. कुठे उरला आपलेपणा आपल आपणच पहातात, माणूस विसरला माणूसकी सारे हैवान होतात. पैशासाठी जो तो इथं करु नये ते करतोय, पैशासाठीच मरतोय आणि जीवही मारतोय. माणसासारख वाग रे सैतान नका होऊ, नांदा सुखाने भावांनो जीव नका घेऊ. जपा ही नाती,माया टिकवा, अपूलकी वाढवा , अंतकरणात ओलावा जीभेवर गोडवा. साथ द्या एकमेका सुख आणि दुःखात, रेशमापरी नाजूक हे जपा साऱ्यांनी नातं...! गायकवाड.आर.जी.दापकेकर न
