STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

नातं...

नातं...

1 min
227

मैत्री नाही ,आपलं नातं आहे,

नातं रक्ताचं असतं नी रक्तात असतं...


दुनिया बुडून जाईल,

जग बदलून जाईल

पण.. नातं तुटत नसतं...


काळ आणि वेळेपुरती

नको गरजेपुरती नाती,

गुन्हा माणसाचा,तुझा-माझा

अन् बदनाम होती नाती...


नात्याला काळीमा फासणारा

नातं बदनाम करणारा माणूस असतो,

त्यात दोष नात्याचा नसतो...


नातं नातंच असतं...

तोडल्यानं तुटत नाही,

जोडल्यानं जुटत नाही...


भलं बुरं घडतं आयुष्यात

प्रत्येकाच्याच, कधी ना कधी...

म्हणून काय नाती तोडायची असतात??


समज, गैरसमज सारं दूर सारून

माणसानं ओळखावं...

स्वतः बरोबर इतरांनाही..


हार जीत नाही

मनाचा मोठेपणा लागतो,

नाती जपण्यासाठी नी,

बांधण्यासाठी...


खरंच नातं मजबूत असतं...

तोडल्यानं तुटत नाही,

जोडल्यानं जुटत नाही..

नातं नातंच असतं..


हे तुला नाही मला ही कळावं

मला नाही तुला ही कळावं

नातं माणसाचं, माणसांशी जुळावं...


समजून घे, विचार कर

मी खूपच सांगतो आहे तुला,

पण...

जपावं तेवढं कमी आहे 

या नात्याला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational